बुधवार, २५ जून, २०२५

🌟 "ज्ञानदीप लावूया...!" 🌟 कविता AE Induction Level Training at IIM Nagpur 2025)

 

🌟 "ज्ञानदीप लावूया...!" 🌟
नवे सहाय्यक अभियंते
नवे अंकुर... नवा श्वास घेऊन आलेत,
दृष्टीला नवे स्वप्न, हृदयाला नवे आर्त सांगावं असे काही घेऊन आलेत.
IIM नागपूरच्या विस्तीर्ण प्रांगणात,
विजेच्या वाटा शोधणाऱ्या या तरुण मनात...
एक ओल, एक आस, एक दीर्घ श्वास आहे —
शिकण्याची, घडण्याची, उजळून निघण्याची आस आहे!
आता आपण आहोत त्यांच्यासाठी दिवा,
ज्याच्या प्रकाशात त्यांना दिसावा मार्ग नवा
आपले अनुभव, तंत्र, विचारांची भाषा —
हीच त्यांच्यासाठी असणार आहे एकमेव आशा !
ही फक्त जबाबदारी नाही, ही एक संधी आहे,
जिथे मार्गदर्शक होणं म्हणजे देवत्त्वाची साक्ष आहे.
म्हणूनच साद देतो आपण प्रेमाने,
"या, घडवा त्यांच्या जीवनात ज्ञानाच्या कळसाची छाया वेगवेगाने."
आपलं कार्य, हीच आपली ओळख आहे,
महापारेषणचं गौरवगान आपल्याच अस्तित्वाने साकारत आहे.
आपण आहात त्या मूल्यासारखे —
ज्याच्यामुळे पिढ्यांचे वर्तमान उजळते, भविष्य आकार घेते!
चला, आपण पेरूया ज्ञान, कौशल्य, साक्षरतेचे बीज,
पेरूया त्यांच्या मनात विश्वासाचं तेज.
अनुभवांच्या सावलीत त्या तरुण पिंपळाला उभं करूया,
एकत्र येऊन एक दीप लावूया — *"ज्ञानदीप लावूया!"*
म्हणूनच, या... घ्या नवचेतनेचा प्रारंभ,
उमटवा विश्वासाचा ठसा प्रत्येक उंबरठ्यावर संथ.
तुमच्यामुळेच घडेल महापारेषणचा तो वटवृक्ष,
ज्याच्या छायेत भविष्य रुजेल... आत्मविश्वासाने सजेल!
"प्रत्येक शब्द असो दीपवत,
प्रत्येक कृती असो प्रेरणास्पर्शत,
या! आपण मिळून उभारू त्या उजेडाच्या वाटा...
जिथे अभियंता घडेल... आणि महाराष्ट्र, राष्ट्र उभं राहील!"
© सुनिलदत्त कुलकर्णी, आरटीसी सहकेंद्र प्रमुख तथा कार्यकारी अभियंता 400 केव्ही ग्रहण केंद्र जेजुरी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला, जागरूकतेला कृतीची जोड देऊया…

  चला, जागरूकतेला कृतीची जोड देऊया… ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज  विद्युत व्यवस्था सुरळीत चालत असताना आपल्या कामाची फारशी चर्चा होत नाही. दि...