#*गेल्या सोमवारच्या दिवशी, दुपारी १२:३३ वाजता इबेरियन वीज-जाळ्यात दक्षिण-पश्चिम भागात अचानक एक मोठा व्यत्यय निर्माण झाला. अवघ्या ३.५ सेकंदांत परिस्थिती अधिकच गंभीर झाली आणि फ्रान्सशी असलेली आंतरजोड तुटली. त्यानंतर संपूर्ण नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती यंत्रणा बंद पडली आणि लगेचच सर्व फिरते (rotating) वीजनिर्मिती प्रकल्प देखील प्रणालीमधून अलग झाले. काहीच क्षणांत संपूर्ण इबेरियन क्षेत्र अंधारात गेले — एकूणच वीजपुरवठा पूर्णतः ठप्प झाला.*
*यावर आधारित*
# *उजेड फक्त येणं महत्त्वाचं नाही, तो टिकणं आणि काळाच्या कसोटीवर उतरणं महत्त्वाचं आहे."*
*कथा: सात्त्विकचा उजेडातून
अंधारात... आणि पुन्हा प्रकाशात वावर*
(MSETCL मधील नव्यानं रुजू
झालेल्या सहाय्यक अभियंत्यांना IIM नागपूरमधील प्रशिक्षणात *ऑनलाइन* येत प्रशिक्षक,ऊर्जा संशोधक आणि अभियंता सात्विक ने सांगितलेली एक
प्रेरणादायी कथा)
मी
सात्त्विक. तुम्ही सगळे आता MSETCL परिवाराचा भाग
झालात हे बघून आनंद होतोय. तुम्ही ज्या यंत्रणेचा भाग आहात, *ती केवळ तांत्रिक नाही, ती एक जबाबदारी आहे—उर्जेच्या माध्यमातून लाखो
आयुष्यांमध्ये प्रकाश पेरायची* !
मी
त्या वेळी स्पेनमध्ये एका नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पात संशोधक होतो. आमचं गाव
लारोझा—सौर पॅनेल्सनी झाकलेलं, स्वच्छ, सुंदर. आम्हाला अभिमान होता की आम्ही सूर्याच्या किरणांवर
जगतो.
*पण त्या दिवशी
दुपारी 12:33 ला सगळं थांबलं.*
संपूर्ण
ग्रीड बंद पडली. केवळ आमचं गाव नाही,
तर
स्पेन, पोर्तुगाल, अँडोरा आणि फ्रान्सचा एक भाग! सगळीकडे अंधार, मोबाईल सिग्नल नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर ढासळलेलं. लोक घाबरले होते. एका वृद्ध
दांपत्याचा मृत्यू झाला—कार्बन मोनॉक्साईड विषबाधेमुळे. एका रुग्णालयात ऑक्सिजन न
मिळाल्यामुळे एक लहान मूल गेलं.
मी
वैज्ञानिक होतो, पण मनातून हादरलो
होतो.
*मी काय शिकलो?*
तांत्रिकदृष्ट्या, ही घटना अनेक त्रुटींचे
मिश्र परिणाम होती:
*नवीकरणीय उर्जेची अति-अवलंबन, पण त्याला पूरक अशा Grid Inertia व्यवस्थांचा अभाव.*
*Storage solutions (BESS,
pumped hydro) ना प्राधान्य न देणं.*
*Reactive power management आणि frequency controlच्या धोरणात
दुर्लक्ष.*
*ग्रीडचा ब्लॅक
स्टार्ट प्लॅन अद्ययावत न करणं.*
*नियोजनापेक्षा
वेगाने घडलेली नवीकरणीय ऊर्जा स्थापना,
पण
त्याला पूरक पायाभूत सुविधा तयार नव्हत्या.*
*ऊर्जा म्हणजे केवळ
निर्मिती नाही, ती संयम, समतोल आणि सतत सजग राहण्याची कला आहे.*
*ऊर्जेच्या
भविष्याचा विचार करताना, आपण ‘Black Start’ साठी सक्षम आहोत का??*
*आणि सर्वात
महत्त्वाचं—तुमचं Engineer म्हणून कर्तव्य
केवळ उपकरणे चालू ठेवणं आहे का??? की त्यामागील मानवी
आयुष्य जपणं???*
Grid Inertia वाढवण्यावर काम
करा. Static नाही, dynamic STATCOMs लावा, *Inertia devices integrate करा* .
Black Start चा भाग व्हा. Thermal power वर अवलंबून न राहता, नवे उपाय शोधा.
*Regulatory आणि Planning मध्ये भाग घ्या. आपण Engineers आहोत, म्हणून आपलं काम फक्त साइटवर नाही, धोरणातही आहे.*
Smart grid, real-time data,
AI forecasting— *हे सगळं तुमच्या हातात आहे.*
*"उजेड फक्त येणं
महत्त्वाचं नाही, तो टिकणं आणि
काळाच्या कसोटीवर उतरणं महत्त्वाचं आहे."*
तुम्ही
आता त्या यंत्रणेचा भाग आहात जी महाराष्ट्राला चालवते.
*प्रत्येक दुर्घटने
नंतर होणारा अंधार, तुमच्या सजगतेमुळे टळेल का?*
*तुमच्या
डेस्कवरची फाईल फक्त एक Proposal आहे, की कोट्यवधी लोकांच्या उजेडाचा आधार?*
याचे उत्तर तुमच्याकडे आहे….
✍️ *लेखन* सुनिलदत्त कुलकर्णी कार्यकारी अभियंता 400 केव्ही ग्रहण
केंद्र जेजुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा