“ *ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण ही केवळ एक protection scheme नाही. ती एक जबाबदारी आहे. यंत्रणेच्या हृदयाचे रक्षण म्हणजे महापारेषणच्या श्वासाचं रक्षण आहे. प्रत्येक CT connection, प्रत्येक relay setting – यामागे विश्वास आहे. आणि या विश्वासावरच MSETCL उभी आहे.”* *कथा शीर्षक: विद्युतप्रवाहातील पहारा – योगेश सरांची प्रेरणादायक वाटचाल*
✍️ *लेखन* - सुनिलदत्त कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, महापारेषण जेजुरी आयआयएम नागपूरच्या भव्य व सुसज्ज सभागृहात आजचा दिवस काहीसा वेगळा होता. MSETCL मधील नव्या दमाचे, उत्साही सहाय्यक अभियंते त्यांच्या इंडक्शन ट्रेनिंगसाठी एकवटले होते. सभागृहात एक प्रकारचा भारलेला, उत्कंठावर्धक शांततेचा भार पसरला होता. कारण सगळ्यांचे डोळे एका व्यक्तीकडे वळले होते – *अभियंता प्रशिक्षक योगेश सर* .
सरांच्या व्यक्तिमत्त्वाचाच तेजस्वी ठसा उमटत होता – शब्दांतला आत्मविश्वास, बोलण्यातला जिव्हाळा, आणि डोळ्यांतून झळकणारा अनुभवाचा प्रकाश… क्षणात वातावरण विद्युत भारीत झालं. विषय तसा कोरडा वाटणारा – Transformer Differential Protection आणि Auxiliary Protection Schemes. पण सर केवळ प्रशिक्षक नव्हते, ते कथाकथनाचे शिल्पकार होते. आणि ही गोष्ट होती यंत्रांच्या दुनियेतून माणुसकीच्या उंबरठ्यावर पोहोचणाऱ्या एका प्रवासाची…
*कथेची सुरुवात:
"प्राणव्यूहातील रक्षक"*
“मित्रांनो,” सरांनी सुरुवात केली, “जसं मानवाच्या शरीरात हृदय रक्तप्रवाह सांभाळतं, तसंच आपल्या विद्युत प्रणालीत ट्रान्सफॉर्मर हे हृदय असतं. हृदय जर साथ सोडेल, तर शरीर गुढग्यापासून खाली बसतं. ट्रान्सफॉर्मरचं संरक्षण म्हणजे संपूर्ण यंत्रणेच्या जीवनशक्तीचं रक्षण.”
*Differential Protection चं गमक सांगताना
सरांनी एक झकास रूपक वापरलं –*
“समजा, एखाद्या खोलीला दोन दरवाजे आहेत. एकातून आत येणाऱ्यांची आणि दुसऱ्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या सारखी असली पाहिजे. जर काही mismatch असेल, तर काहीतरी गडबड आहे. *अगदी तसंच Kirchhoff's Law वापरून ट्रान्सफॉर्मरमधल्या प्रवाहावर नजर ठेवतो Differential Relay.”**
*प्रेमात दगा – CT Polarity Mismatch ची कथा*
“एकदा,” सर म्हणाले, “आमच्याकडे 220kV सबस्टेशनमध्ये Differential Relay सारखा बिचारा सतत tripping देत होता. आठवडाभर झगडल्यावर लक्षात आलं – CT ची polarity उलटी होती. हे म्हणजे एखाद्याने प्रेमात विश्वास टाकून फसवणूक केल्यासारखं! relay इतक्या दिवसांपासून ओरडत होता, पण ऐकणार कोण?”
*Inrush Current ची ‘दादागिरी’*
“कधी कधी ट्रान्सफॉर्मर सुरू करताच relay खोटा trip देतो. जसं एखादी गृहिणी नवऱ्याला उठवायला जाते, आणि त्यानं डोळे उघडायच्या आधीच ती ओरडायला लागते – 'अजून झोपतोस?' अरे थांब ना, तो उठायच्या तयारीत असतो!”
सरांनी
यावर Harmonic Restraint समजावलं –
*“दुसऱ्या harmonic ची उपस्थिती समजली
की relay म्हणतो – 'हा inrush आहे, fault नाही' – आणि शांत बसतो. हे म्हणजे चुकीचा राग ओळखून क्षमाशील
होणं.”*
सरांचं
पुढचं वाक्य सगळ्यांना थांबवून ऐकायला लावणारं होतं –
*“फक्त मुख्य संरक्षण पुरेसं नाही मित्रांनो… buchholz , तापमान सुरक्षा, प्रेशर रिलीफ – हे सगळं म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या आतल्या भावना. जो त्यांच्या वेदना ऐकतो, तोच खरा अभियंता!”*
सरांनी
एक हृदयस्पर्शी प्रसंग सांगितला –
*“एका ठिकाणी Buchholz relay सतत अलार्म देत होता. पण ऑपरेटरनं दुर्लक्ष केलं. काही तासांत ट्रान्सफॉर्मरचं winding जळून गेलं. यंत्राची ही वेदना होती. माणसासारखंच – आतून कोसळायच्या आधी यंत्र संकेत देतं. पण आपण दुर्लक्ष करतो* …”
*SCADA मधील संवादाचा
गोंधळ*
“SCADA म्हणजे यंत्रांची
भाषा… पण संवाद नीट नसेल तर गैरसमज होतो.”
“एकदा DR रिपोर्टमध्ये trip चं कारणच सापडलं नाही. कारण SOE (Sequence of Events) नीट सेट नव्हता. हाच प्रकार, जणू एखाद्याने मेसेज पाठवला, पण नेटवर्क नसल्यामुळे तो पोहोचलाच नाही!”
*समारोप: संरक्षण
म्हणजे यंत्राचं नव्हे, विश्वासाचं रक्षण*
योगेश
सर शेवटी म्हणाले –
“ *ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण ही केवळ एक protection scheme नाही. ती एक जबाबदारी आहे. यंत्रणेच्या हृदयाचे रक्षण म्हणजे महापारेषणच्या श्वासाचं रक्षण आहे. प्रत्येक CT connection, प्रत्येक relay setting – यामागे विश्वास आहे. आणि या विश्वासावरच MSETCL उभी आहे.”*
सभागृहात क्षणभर शांतता… आणि मग टाळ्यांचा कडकडाट!
*निष्कर्ष:
तंत्रज्ञानामागचा भाव*
*प्रशिक्षण म्हणजे
केवळ स्कीम, relay किंवा SCADA शिकणं नव्हे… ते म्हणजे त्या
यंत्रणेमागच्या जबाबदारीचं भान ठेवणं.*
योगेश सरांनी शिकवलं – *प्रत्येक beep, प्रत्येक अलार्म ही केवळ चेतावणी नाही, ती यंत्रणा आपल्याशी बोलते आहे… फक्त ऐकायला शिकायला हवं.*
🔌 *‘विद्युतप्रवाहातील
पहारा’ ही केवळ यंत्रांची कथा नव्हे… ती माणसाच्या अंत:करणाशी तांत्रिकतेने
जोडलेली एक प्रेरणादायी वाटचाल आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा