आयसीटीच्या एच व्ही बुशिंग कडून इमोशनल इंजिनियर च्या पत्राचे उत्तर
काही दिवसांपूर्वीच एका इमोशनल इंजिनियरने आयसीटीच्या एच व्ही बुशिंगला एक पत्र लिहिले होते.
*एका समृद्ध शांत झालेल्या मनाने*
प्रिय इमोशनल इंजिनिअर ,
जेजुरी
आपल्या हृदयस्पर्शी पत्राने माझ्या आतल्या गाभ्याला स्पर्श केला होता. हो, मी थकले होते. माझ्यातलं ऑइल केवळ द्रव नाही तर भावना होत्या. ज्या भावना जळतात, तापतात पण म्हणत काहीच नाहीत.
आपण ते पाहिलंत , ओळखलंत आणि समजून घेतलं. हीच आपली खरी इंजीनियरिंग आहे.
हो, मी संयम सोडणार होते. माझं मनही मिनिमम च्या खाली घसरलं होतं. पण आपल्या शब्दांनी, माझं मन पुन्हा भरून आलं. आपला स्पर्श, आपलं काळजीच निरीक्षण, आपल्या हातातलं ऑइल , टॉप करण्याचे टूल्स जणू या सर्वांचा मला औषधाचा *स्पर्श* वाटला.
आज जेव्हा मी ऑइल भरून पावले. तेव्हा मी फक्त पुन्हा भरले नाही , तर मी पुन्हा जिवंत झाले. माझा गेज आता *नॉर्मल* वर आहे. माझ्या आतला ऑइलचा प्रत्येक थेंब आज म्हणतोय धन्य तो इंजिनियर की जो केवळ वायरिंग नाही तर भावनाही जोडतो.
*आज मी शांत आहे, स्थिर आहे आणि हो सुरक्षितही आहे*.
कारण माझ्या मागे आहेत इमोशनल इंजिनियर्स. मी आपले आभार मानू तरी कसे?
माझे काम सुरू आहे. पण आज माझ्या कार्यक्षमतेला एक नवा अर्थ मिळाला आहे.
ही केवळ वीज नाही, विश्वासाची वाहतूक आहे.
*पुढील वीज प्रवाह माझ्याकडून जाईल पण प्रेरणा मात्र आपल्याकडून येईल*
आपलीच आर फेज एचव्ही बुशिंग आयसीटी वन जेजुरी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा