*"तुमचं उपकेंद्र तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे… पण सायबरदृष्ट्या सुरक्षित आहे का?"*
*"आपण सगळेच विचार करतो, की पॉवर सिस्टीममधला सर्वात मोठा धोका म्हणजे शॉर्टसर्किट... पण खरी भीती आता तांत्रिक वायरिंगमधून नाही, तर अदृश्य नेटवर्कमधून – सायबर स्पेसमधून होणाऱ्या हल्ल्यांपासून आहे!"*
💻 कथा शीर्षक:* *"सायबर संग्रामाची बोधकथा – श्रीपाद सरांचा ऑनलाइन धक्का"*
*(युक्रेन पॉवर ग्रीडवरील सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषण अभियंत्यांना मिळालेला आत्मसाक्षात्कार)*
✍️ *लेखन*- सुनिलदत्त कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, महापारेषण जेजुरी.
🌆 सकाळची वेळ – IIM नागपूर
थोड्याच वेळात एक महत्त्वपूर्ण ऑनलाइन प्रशिक्षण सत्र सुरू झालं . स्क्रीनवर एक शांत, संयत व्यक्तिमत्व उभं राहिलं – श्रीपाद सर. त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणे शांत होता, पण त्यांच्या डोळ्यांत आज काहीतरी वेगळंच होतं –
*एक जागृती, एक संदेश... आणि एक धक्का.*
🎯 *प्रस्तावना – तांत्रिकतेपलीकडचा धोका*
*"आपण सगळेच विचार करतो, की पॉवर सिस्टीममधला सर्वात मोठा धोका म्हणजे शॉर्टसर्किट... पण खरी भीती आता तांत्रिक वायरिंगमधून नाही, तर अदृश्य नेटवर्कमधून – सायबर स्पेसमधून होणाऱ्या हल्ल्यांपासून आहे!"*
सगळे अभियंते थबकले. हाय व्होल्टेज, पीटी, सीटी, ट्रान्सफॉर्मर – या नेहमीच्या विषयांत गुंतलेल्या मेंदूंना एकदम वेगळी दिशा मिळाली होती.
⚡ *२०१५ – युक्रेनवरील सायबर हल्ला : अंधारात गेलेले लाखो लोक*
"२३ डिसेंबर २०१५, संध्याकाळचे ५ वाजले होते... युक्रेनमधील तीन पॉवर वितरण कंपन्यांमध्ये अचानक अंधार पसरला. २.३ लाख नागरिक अंधारात बुडाले – एका क्लिक मुळे.
होय, एका क्लिकने SCADA प्रणालीवर ताबा मिळवला गेला.
BlackEnergy नावाच्या मालवेअरने सर्व यंत्रणांचं नियंत्रण घेतलं.
Relay Protection च्या सेटिंग्स बदलल्या.
Manual ट्रिपिंग केलं – पण तेव्हा नियंत्रण कक्षात कोणीच नव्हतं!
Backup Systems ला सुद्धा फसवले गेले होते..."
*शब्दांमध्ये भीती नव्हती, पण सत्याचा तोल सांभाळलेला होता.*
🧠 *सायबर हल्ल्याचं सूत्र – केवळ संगणक नव्हे, तर मानसिक लढाई*
हॅकर्सनी Remote Access Trojans वापरून डिजिटल दरवाजे उघडले.
पारंपरिक वायरिंग सुरक्षित असली, तरी डिजिटल तळं फुटलं.
*इथे सुरक्षा म्हणजे तांत्रिक ज्ञान + जागरूकता.*
*इथे दुर्लक्ष म्हणजे संकट.*
📉 *परिणाम – केवळ अंधार नव्हे, तर ठप्प झालेलं आयुष्य*
अचानक वीज गेली...
रुग्णालयात लाईफ सपोर्ट थांबला...
रेल्वे सेवा थांबली...
उद्योग बंद पडले...
जनतेचा विश्वास हादरला.
⚠️ *भारतासाठी आणि महापारेषणसाठी मिळालेला बोध*
श्रीपाद सरांनी भारताचा नकाशा स्क्रीनवर दाखवला –
अनेक उपकेंद्रं, हजारो किलोमीटरचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क, SCADA आणि SAS प्रणाली...
*"संपूर्ण पॉवर ग्रीड ने आता डिजिटल युगात प्रवेश केंला आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा ही आता पर्याय नाही, ती आवश्यकताच आहे!"*
🔐 *सायबर सुरक्षा – अभियंत्यांचं नवीन कवच*
सरांनी सायबर संरक्षणाचे पाच आधारस्तंभ उलगडले –
SCADA आणि SAS यंत्रणांना DMZ (Demilitarized Zone) मध्ये ठेवणं
MFA – मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशनची अंमलबजावणी
RBAC – Role Based Access Control
SIEM – Security Incident & Event Management सिस्टीम
Regular Cyber Drills – अग्निशमन सरावासारख्या सायबर सराव चाचण्या
*“या सगळ्या गोष्टी आता तुमच्या सिस्टिमच्या हायजिनचा भाग व्हायला हव्यात. जेवढं सवयीचं PPE घालणं महत्त्वाचं आहे, तेवढंच सायबर सेफ्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे,” – सर शांतपणे म्हणाले.*
🧩 सरांचा विचारप्रवर्तक प्रश्न:
*"तुमचं उपकेंद्र तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे… पण सायबरदृष्ट्या सुरक्षित आहे का?"*
या प्रश्नाने अनेक अभियंत्यांच्या मनात वीज चमकली – त्यांच्या मेंदूतील सर्किट्स सक्रिय झाले.
📘 *अनुभवाची पावती – एक प्रशिक्षणार्थ्याचा प्रतिसाद*
प्रशिक्षण घेत असलेल्या अनुरागने चॅटमध्ये लिहिलं –
*"सर, आज लक्षात आलं की आपण फक्त ट्रान्सफॉर्मर्सचं संरक्षण करत नाही… आपण डेटा, सिस्टीम आणि लोकांच्या विश्वासाचंही संरक्षण करतो!"*
💡 *अंतिम संदेश – अभियंता ते सायबर वॉरिअर*
*"वीज जाणं हा अपघात नाही… ती मुद्दाम बंद केली गेली, आणि आपल्याला ते समजलं नाही, हाच खरा धोका आहे.*
म्हणूनच, आता अभियंत्याचं उत्तरदायित्व बदललं आहे –
तुम्ही केवळ यंत्रे सांभाळणारे अभियंते नाही...
*तुम्ही सायबर वॉरिअर्स आहात!"*
🔐⚡💻 *समाप्ती – एका धड्याची सुरुवात*
ही होती एक खरी कथा –
एका क्लिकचा हल्ला,
एक काळजाला भिडणारा धडा,
आणि अभियंत्यांच्या मनात उमललेली नवदृष्टी.
श्रीपाद सरांनी दिलेलं हे बोधसत्र फक्त शिक्षण नव्हतं,
ते होतं –
*"भविष्यातला अंधार रोखण्यासाठी आजपासून उजेड निर्माण करण्याचं आवाहन!"*
*आता अभियंते फक्त ग्रीडचं नाही, तर संपूर्ण विश्वासाचं रक्षण करत आहेत – एक संगणक, एक डोळस नजर, आणि एक सजग मन घेऊन.*
🔒🔧🌐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा