*"जिथे हिशेब आहे, तिथेच विश्वास आहे!"*
*कथा शीर्षक: “खात्यांचं गणित आणि अभय सरांची शिकवण”*
✍️ लेखन-सुनिलदत्त कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, महापारेषण जेजुरी
🎯 *प्रस्तावना* – प्रेरणादायी सुरुवात
IIM नागपूरमध्ये MSETCL च्या नवोदित सहाय्यक अभियंत्यांसाठी ‘प्रेरण’ प्रशिक्षण सत्राची नांदी झाली होती. तांत्रिक ज्ञानासोबत व्यवस्थापनाच्या गाभ्यातील तत्व शिकवण्याचं हे एक अनोखं व्यासपीठ होतं. स्टेजवर पाऊल टाकलं, प्रशिक्षक अभय सरांनी.
ते म्हणाले –
*“तुम्ही कितीही उत्तम योजना आखली, पण तीची जर नोंद केली नाही, तर ती केवळ एक विस्मृती ठरते!”*
📘 *अध्याय 1: खात्यांचं गणित – नोंदीतून नीती*
अभय सरांनी पहिला धडा Accounting Practices वर दिला. त्यांच्या बोलण्याने आकड्यांची एक नवी दुनियाच उलगडली.
Accounting Standards and Compliance: "महापारेषणमध्ये प्रत्येक खर्च, प्रत्येक व्यवहार हा वीज नियामक आयोगाच्या नियमांच्या चौकटीत बसावा लागतो."
Chart of Accounts: व्यवहारांची नोंद कोणत्या कोडखाली जाते, यावरूनच त्याचं स्वरूप ठरतं. पैसा कुठून आला, कुठे गेला, याचा ठावठिकाणा हाच चार्ट देतो.
Journal Entries आणि Ledger Maintenance: अभय सर म्हणाले –
"तुमचा खर्च ledger मध्ये योग्यरित्या बसला नाही, तर तो खर्च राहत नाही – तो गोंधळ बनतो."
त्यांच्या तोंडून आलेले हे शब्द म्हणजे अर्थशास्त्रातल्या नीतीचा मंत्र होता.
📊 अध्याय 2: आर्थिक आरसे – संस्थेचं खऱ्या अर्थानं प्रतिबिंब
Balance Sheet – संस्था आर्थिक दृष्ट्या उभी आहे की कोसळतेय, याचं पहिलं प्रतिबिंब.
P&L Statement – उत्पन्न, खर्च आणि नफा यांचं संतुलन.
Cash Flow Statement – केवळ नफा असून उपयोग नाही, रोख कुठून आली आणि कुठे गेली, याची खरी कहाणी इथे दडलेली.
*"खात्यांचे आकडे म्हणजे संख्येच्या आड दडलेली सत्यकथा – ज्यांना ती समजते, तेच खरे अर्थशूर!"*
💼 *अध्याय 3: देणं-घेणं – विश्वासाचं अर्थशास्त्र*
Accounts Payable & Receivable – योग्यवेळी दिलं नाही किंवा घेतलं नाही, तर मेल बॉक्समध्ये ‘reminder’ची गर्दी वाढते, पण खात्यात शून्य उरतो.
Advance आणि Deposits Handling – प्रत्येक आगाऊ रक्कम म्हणजे एक जबाबदारी; ती फक्त नोंद नव्हे, तर कंपनीच्या प्रतिष्ठेचा भाग असतो.
*"देणं विसरला तर विश्वास हरवतो; घेणं विसरला तर अर्थशास्त्र संपतं!"*
🏗️ *अध्याय 4: स्थावर संपत्ती – नोंदीतून मूल्यनिर्मिती*
Capitalization – नवीन सबस्टेशन उभं करणं म्हणजे केवळ इमारत नव्हे, तर भांडवलामध्ये मूल्य वाढवणं.
Depreciation – वस्तूंचं आयुष्य कमी होतं, पण नोंदीत त्याची योग्य हिशेबशीर घसरण असावी लागते.
Asset Disposal – जुनं झालेलं टाकून न देता, नियमानुसार त्याचं पुनर्विनियोग करणं हीदेखील एक कला आहे.
🧭 *अध्याय 5: महापारेषणची आर्थिक रचना – उर्जेचं व्यवस्थापन*
Revenue Streams – ट्रान्समिशन चार्जेस, Open Access उत्पन्न, विविध शुल्क.
Expenditure – O&M खर्च, भांडवली गुंतवणूक, कर्मचाऱ्यांचे वेतन.
Financial Objectives – खर्चावर नियंत्रण, समतोल नफा आणि आर्थिक टिकाव.
🔮 *अध्याय 6: नियोजन आणि विश्लेषण* – *पैशाचा आराखडा*
Budgeting & Forecasting*
– ‘उद्या किती लागेल?’ याचा अंदाज म्हणजे चांगल्या व्यवस्थापनाचं पहिलं पाऊल.
Cost Allocation – थेट, अप्रत्यक्ष आणि overhead खर्च यांचा स्पष्ट हिशेब.
Variance Analysis – ठरवलेलं आणि प्रत्यक्ष घडलेलं यातला फरक ओळखणं म्हणजे शहाणपण.
⚠️ *अध्याय 7: जोखीम आणि विश्वास – आर्थिक जबाबदारीची शिस्त*
Financial Risk Management – उद्याच्या अनिश्चिततेसाठी आजपासून तयारी करणं.
Financial Reporting – प्रत्येक भागधारकाला पारदर्शकता हवी असते, ही त्यांच्या विश्वासाची पायरी.
Audit & Compliance – CAG, Internal Audit, Power Sector Norms यांचं पालन केल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण मानलं जात नाही.
*"जिथे हिशेब आहे, तिथेच विश्वास आहे!"*
💡 अंतिम शिकवण
सत्राच्या शेवटी एक प्रशिक्षणार्थी म्हणाला –
*"सर, आतापर्यंत वाटायचं की हे सगळं फक्त Finance विभागाचं काम आहे… पण आज समजलं, की आर्थिक शिस्त ही प्रत्येक अभियंत्याची जबाबदारी आहे!"*
अभय सर हसले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आश्वासक तेज होतं. त्यांनी केवळ एक वाक्य उच्चारलं –
*"रचना तयार करणं हे इंजिनीयरिंग आहे… पण ती रचना उभी ठेवणं हे आर्थिक शहाणपण आहे!"*
ही होती *खात्यांच्या आकड्यांमधली शिकवण* – जी कधी ledger मध्ये दिसते, कधी आत्म्याच्या आरशात उमटते.
ही होती ‘प्रेरणे’ची गोष्ट – *जी हिशेबातून होणाऱ्या शिस्तीची शपथ होती.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा