#*नवा प्रवास – आत्मभानाचा, ज्ञानाचा आणि सेवेचा* #*वीज फक्त वाहत नाही… ती जागवत असते – एक सत्व, एक ध्येय आणि एक राष्ट्र, महाराष्ट्र *कथा: "वीज प्रवाहाच्या वाटेवर* – *(इंडक्शन ट्रेनिंगमधील प्रेरणादायी कथा)* ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, कार्यकारी अभियंता , महापारेषण जेजुरी
IIM नागपूरच्या त्या शिस्तबद्ध, उर्जायुक्त वातावरणात महापारेषणचे नवोदित सहाय्यक अभियंते मोठ्या उत्सुकतेने समोर बसले होते. आजचा दिवस खास होता. कारण मंचावर उभे होते भारत सर - एक असामान्य शिकवण्याची शैली असलेला अभियंता – भारत सर.
त्यांची नजर सगळ्यांवर फिरली. हळूच एक स्मित. आणि मग त्यांनी सुरुवात केली…
"मित्रांनो… *एकदा
काय झालं* … एक लहानसा गाव. डोंगराच्या कुशीत विसावलेला. गावातला एक मुलगा –
अर्णव. वीज नव्हती गावात. रात्र म्हणजे काळोख. शिक्षण, आरोग्य, शेती – सगळं थांबल्यासारखं. पण अर्णवच्या
डोक्यात एकच प्रश्न – *“ही वीज नक्की येते कुठून?”*
एक दिवस त्याने ठरवलं – ‘ *मी वीजेचा प्रवास समजून घेणार.’ आणि तिथून सुरू झाला त्याचा प्रवास – आपल्या आजच्याच चर्चेचा प्रवास!"*
*भाग १: विद्युत
प्रणालीचा महासंग्राम*
"अर्णव प्रथम
पोहोचला विद्युत निर्मिती केंद्रात – तेथून सुरू होते Electric Power System.
जणू पृथ्वीच्या अंत:करणातून बाहेर पडणाऱ्या ज्वालामुखीप्रमाणे – ही उर्जा उगम पावते Thermal, Hydro, Nuclear आणि आता आपली सौर-संधानित Renewable."
"त्या विद्युत निर्मितीला लागते Frequency आणि Voltage चे नियंत्रण. त्याला तयार करावं लागतं प्रवासासाठी – उच्च दाबात – High Voltage Transmission!"
*भाग २: वीज
निर्मितीची चार रूपं – अर्णवचा अभ्यास*
" *थर्मल* – कोळशातून
उष्णता, उष्णतेतून वाफ, वाफेतून जनरेशन.
*हायड्रो* – धरणातून
येणाऱ्या धबधब्यासारखी नैसर्गिक शक्ती.
*न्यूक्लिअर* –
शिस्तबद्ध पण जबरदस्त!
*आणि रिन्युएबल्स* – *जिथे सूर्याची किरणं आणि वाऱ्याचं गाणं बनतं उर्जेचा नवा मंत्र."*
" *प्रत्येक निर्मितीचा आपला Efficiency, Reliability, आणि Risk चा ताळमेळ* असतो. हे समजून घेताना अर्णवला कळालं – *शक्ती फक्त निर्माणच नाही, तर जपणंही तेवढंच महत्त्वाचं!"*
*भाग ३: वितरण
यंत्रणेचे अदृश्य हात*
"उत्पन्न झालेली वीज मग पोहोचते Transmission Lines ने, आणि शेवटी येते Distribution System मध्ये – हेच तर असतं विद्युतप्रवाहाचं अंतिम रूप."
*"Distribution Substations, Feeders, Primary आणि Secondary Networks* – हे सगळं म्हणजे जणू मानवी शरीरातील शिरा आणि धमनीसारखं – प्रत्येक झोपडीपर्यंत पोहोचवणारं."
*भाग ४: संरक्षक
योद्धे – संरक्षण यंत्रणा*
"पण अर्णवने पाहिलं
– या वाटेत धोके आहेत. *Faults, Overloads, Short Circuits!*
म्हणूनच निर्माण झाले *Distribution System Equipment – Circuit Breakers, Reclosers, Fuses आणि Protective Relays!"*
" *हे म्हणजे जणू आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती – Fault झाला की Detection, Isolation आणि Restoration!"*
*भाग ५: धक्का तंत्र
आणि एकच शिकवण*
"आता मी तुम्हाला एक
धक्का देतो…" – भारत सर म्हणाले आणि
सर्वजण क्षणभर दचकले
" *अर्णव.* .. तो मुलगा म्हणजे *आपणच* आहोत. *हा विद्युतप्रवाहाचा प्रवास, हे शिक्षण, हे ज्ञान – हे आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनात आहे."*
" *वीज ही केवळ यांत्रिक गोष्ट नाही… ती एक प्रेरणा आहे, एक जबाबदारी आहे, आणि एक वचन आहे – अंधार मिटवण्याचं!"*
प्रत्येक प्रशिक्षणार्थीची मान अभिमानाने
उंचावली होती.
शब्द, भावना आणि विज्ञान यांचा संगम म्हणजेच भारत सर चे धक्का तंत्र… आणि त्या दिवशी महापारेषणच्या नवोदित अभियंत्यांना *एक नवा प्रवास गवसला – आत्मभानाचा, ज्ञानाचा आणि सेवेचा*
*"कारण वीज फक्त वाहत नाही… ती जागवत असते – एक सत्व, एक ध्येय आणि एक राष्ट्र, महाराष्ट्र !"*