# *जमिनीच्या गर्भातली जादू – EHV Cable Systems** “ *Conductor म्हणजे तिचं हृदय,*
*Insulation म्हणजे तिची त्वचा,*
*Sheath म्हणजे कवच –*
*आणि या सगळ्यावर उभी आहेत आपली शहरं, उद्योग, मेट्रो आणि आधुनिक जीवनशैली.”*
*कथा शीर्षक: "पृथ्वीखाली धावणारी वीज – EHV केबल्सचा प्रवास"* ✍️ *लेखन* - सुनिलदत्त कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, महापारेषण जेजुरी *स्थळ* : आयआयएम नागपूर
*प्रसंग* : महापारेषणच्या नवोदित सहाय्यक अभियंत्यांचे प्रेरणादायी प्रशिक्षण सत्र
*मार्गदर्शक* : विलास सर – अनुभवाने भारलेले, तंत्रज्ञानाच्या गाभ्यातले पण मनाने कवी
प्रोजेक्टरवर प्रकाश पडतो आणि विलास सरांचा
भारदस्त, पण हळवा आवाज ऐकू
येतो –
*“आज मी तुम्हाला एका अशा विजेची कथा सांगणार आहे, जी आकाशात चमकत नाही… पण पृथ्वीच्या अंतरंगातून
धावते.*
ही वीज नजरेआड आहे, पण तिच्या अस्तित्वाशिवाय आधुनिक शहरांचा श्वासोच्छ्वासही अशक्य.
*ही आहे – EHV केबल्सची कथा… जमिनीखाली धावणाऱ्या विजेची कहाणी!”*
*भाग १: जमिनीच्या गर्भातली जादू – EHV Cable Systems*
“ही केबल म्हणजे विजेचा राजमार्ग… पण तो अंधारात आहे.
त्याचं संरचनात्मक सौंदर्य, त्याचं शिस्तबद्ध अस्तित्व – ते सामान्य
डोळ्यांना दिसत नाही,
पण त्याशिवाय घरातला दिवा पेटणार नाही.”
“ *Conductor म्हणजे तिचं हृदय,*
*Insulation म्हणजे तिची त्वचा,*
*Sheath म्हणजे कवच –*
*आणि या सगळ्यावर उभी आहेत आपली शहरं, उद्योग, मेट्रो आणि आधुनिक जीवनशैली.”*
EHV केबल्स म्हणजे शहरीकरणाच्या काळातली यंत्रयुगातील *नव्या नसा* – ज्या जमिनीखाली असूनही हजारो लोकांचे आयुष्य उजळवतात.
*भाग २: भूमीमापन ते नियोजन – Pre-Installation Considerations*
विलास सर नोंदवही उघडतात.
*“एका उत्तम शल्यक्रियेसाठी जसं रुग्णाचं पूर्ण इतिहास घ्यावं लागतं,*
*तसं EHV केबल टाकायच्या आधी जमिनीचं भूगर्भशास्त्र समजून घ्यावं लागतं.”*
जमिनीचा प्रकार, उष्णता वहन क्षमता,
EMF प्रतिबंध, रूट मंजुरी, जलवाहिन्या, केबल trench मध्ये पाणी साचण्याची शक्यता –
*सगळं सखोल अभ्यासावं लागतं.*
“मुंबईत आम्ही एक प्रकल्प केला. सर्व प्लॅनिंग झालं होतं.
पण रस्ता संपता संपता एक नाला समोर आला –
आणि आम्ही डिझाईन बदललं नसतं , तर करोडोचं नुकसान झालं असतं.”
शिक्षण?
*योजना नीट केली, तर तांत्रिक अडथळे आणि अपयश यांचं सावट दूर राहतं.*
*भाग ३: भूमीचा श्वास – Cable Laying Techniques*
सर आता प्रत्यक्ष कामाची दृश्यं दाखवतात –
ट्रेंचिंग मशीन, केबल ड्रॅमची ओढणी…
“EHV केबल टाकणं म्हणजे पृथ्वीवर surgery करणं.
Depth अचूक असली पाहिजे.
Bending radius ओलांडलं तर केबल
दमते.
Sheath bonding चुकीचं झालं, तर EMF त्रास देतो.
Backfilling म्हणजे फक्त खड्डा भरायचा नाही –
तर त्या केबलला मोकळा श्वास द्यायचा असतो.”
*तांत्रिक कामही काळजीने, प्रेमाने आणि समजूतदारपणाने करावं लागतं,*
हे ते शिकवतात – शब्दांनी नव्हे, उदाहरणांनी.
*भाग ४: केबलची परीक्षा – Post-Installation Testing*
“केबल टाकली म्हणजे काम झालं असं नाही,”
विलास सर म्हणतात.
“सर्जरीनंतर टेस्टिंग करावं लागते – केबलचं ही तसंच”
*VLF टेस्ट, Sheath टेस्ट, Partial discharge टेस्ट –*
*या सगळ्या म्हणजे आरोग्याच्या तपासण्या.*
“पुण्यात एका डेपोमध्ये आम्ही HV टेस्ट केली –
केबल चालू करण्याआधीच एक गंभीर दोष सापडला.
वेळ मिळाला, तर नुकसान टळतं – आणि तेच अभियंत्याचं यश असतं.”
*भाग ५: केबलचं आरोग्य – Maintenance & Fault
Repair*
“तांत्रिक कामामध्येही माया असते –
Routine Maintenance म्हणजे joints तपासणं,
Thermal Scanning म्हणजे तिच्या तापमानाचं निरीक्षण,
Sheath Monitoring म्हणजे ती सजीव असल्याचं लक्षण!”
Fault Detection चा किस्सा सांगताना विलास सर हसतात –
*“Time Domain Reflectometer वापरून एका faulty केबलचा दोष आम्ही 672 मीटरवर शोधला होता –*
*आणि खोदल्यावर बरोबर तिथंच जळालेली केबल सापडली!”*
ही केबल बोलत नाही…
पण अनुभवी अभियंत्याला ती हाक मारते – योग्य दिशेनं.
*भाग ६: धक्का तंत्र आणि अंतिम संदेश*
सगळं शांत होतं… विलास सर थांबले.
शब्द जणू थोडे घशात अडकले… आणि मग ते बोलले –
“ही EHV केबल जमिनीखाली आहे –
पण तिचं सामर्थ्य आकाशाइतकं आहे.
ती दृश्य नाही, पण ती स्पंदन आहे –
प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवणारी जीवनवाहिनी.”
“तुम्ही जेव्हा ही केबल हाताळाल,
तेव्हा केवळ वायर नाही,
तर जणू एखादी जिवंत नस हातात घेतल्यासारखं भान
ठेवा.
तिला टेक्निकल ज्ञानाची गरज आहे, पण त्याहून अधिक
संवेदनशीलतेची गरज आहे.”
सत्र संपलं…
*पण नवोदित अभियंत्यांच्या मनात वीज वाहू लागली होती –*
*विचारांची, जबाबदारीची आणि नव्या महाराष्ट्रा च्या उभारणीची.*