*"ट्रान्समिशन प्रकल्प म्हणजे केवळ टॉवर्स, केबल्स, आणि टेंशन स्ट्रिंग नाही, त्यामागे असते एक अखंड, तपश्चर्येसारखी Monitoring System!"*
🗼*कथा शीर्षक*: *"विद्युतप्रवाहाची शर्थ: कुंदन सरांची प्रेरक कहाणी"*
✍️ *लेखन*- सुनिलदत्त कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, महापारेषण जेजुरी.
*प्रस्तावना* :
*"अभियंता होणं म्हणजे केवळ यंत्रे चालवणं नव्हे, तर त्या यंत्रांमागील जबाबदारीचं भान बाळगणं असतं!"*
आयआयएम नागपूरच्या दिमाखदार सभागृहात महापारेषणच्या नवोदित सहाय्यक अभियंत्यांचं इंडक्शन ट्रेनिंग सुरू होतं. ताज्या पदवीधारकांच्या चेहऱ्यावर भविष्याची *उमेद* होती, पण डोळ्यांत एक अनामिक *चिंता* .
*त्यांची स्वप्नं अर्धवट होती — अजून आकार घेत होती.*
अशा वातावरणात एक तेजस्वी, आत्मविश्वासाने ओसंडून वाहणारा चेहरा सभागृहात प्रवेश करतो — *कुंदन सर* . त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवाचा तेज झळकत होतं , आणि त्यांच्या चालण्यात एक ठाम ध्येयवाद होता. आज त्यांचा विषय होता:
*"Transmission Project Execution & Monitoring Systems, Advanced Monitoring Concepts आणि Future Trends."*
*भाग १: एक प्रकल्प, एक शपथ*
"२०१४ साल," सर बोलू लागले, त्यांच्या आवाजात स्मरणांचा भार होता, "विदर्भातल्या एका अतिदुर्गम भागात ट्रान्समिशन प्रकल्प हाती घेतला होता. समोर नद्या होत्या, जंगलं होती, आणि सर्वात मोठं आव्हान — वेळ आणि संवादाचा अभाव!"
पण एका गोष्टीबाबत मी ठाम होतो —
*हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायलाच हवा! हे माझ्यासाठी काम नव्हतं... ही माझी शपथ होती* .
श्रोत्यांचे डोळे आता चमकू लागले होते. काहीजणांना आपोआप श्वास रोखावा लागला — त्या क्षणात सगळे सरांच्या कथेमध्ये हरवून गेले.
*भाग २: Monitoring म्हणजे जबाबदारीचा धागा*
*"ट्रान्समिशन प्रकल्प म्हणजे केवळ टॉवर्स, केबल्स, आणि टेंशन स्ट्रिंग नाही," सर म्हणाले, ""त्यामागे असते एक अखंड, तपश्चर्येसारखी Monitoring System!"*
SCADA-based real-time monitoring, GIS mapping, Drone-based tower inspection
— त्या काळात हे तंत्रज्ञानं अजून नविन होते , पण आम्ही ते उभं केलं . पहिल्यांदाच साइटवर Live Dashboard उभा केला — तिथं फक्त इंजिनिअरिंग नव्हतं , तिथं होती दृष्टिकोनाची क्रांती!
सरांचे शब्द जणू 400kV च्या विद्युतप्रवाहासारखेच —
*प्रभावी, नेमके, आणि शाश्वत.*
*भाग ३: उन्नत निरीक्षण — तंत्रज्ञानाच्या नवक्षितिजांकडे*
"आज आपण केवळ प्रत्यक्ष स्थिती बघत नाही, तर भविष्यातील अडचणी आधीच ओळखतो," सर म्हणाले.
Thermal imaging, IoT आधारित सेन्सर्स, Digital Twin Models — यांचा वापर करून आपण Preventive नाही, तर Predictive Maintenance करत आहोत., करणार आहोत .
Projector वर त्यांनी एक 3D सबस्टेशनचं प्रतिरूप दाखवलं — एका क्लिकवर तापमान, लोड, फॉल्ट इतिहास, देखभाल वेळापत्रक... सर्व काही दिसत होतं. विद्यार्थ्यांचे डोळे विस्फारले गेले — आणि ओठांवर शब्द उमटले:
*"हेच तर आम्हाला करायचं आहे!"*
*भाग ४: भविष्याची दिशा — आजच्या अभियंत्यांनी घडवलेली*
*"तंत्रज्ञान म्हणजे प्रवाह — थांबता कामा नये!" सर म्हणाले. "भविष्यातलं Transmission असेल —"*
*AI आधारित Fault Detection*
*Augmented Reality द्वारा Field Work*
*Satellite Imagery द्वारा ROW Monitoring*
*Blockchain आधारित ऊर्जेचं व्यवहार व पारदर्शक रिपोर्टिंग*
सर हसले आणि म्हणाले,
*"या फक्त कल्पना नाहीत — या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात उतरवणार आहात!"*
एक क्षण शांतता होती. सरांनी एक खोल श्वास घेतला.
"एक गोष्ट सांगतो," ते म्हणाले.
*"प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या फक्त दोन आठवडे आधी, एका टॉवरखालील पाण्याच्या प्रवाहाने पाया उखडून टाकला. जणू प्रकल्पावर काळोख पडणार होता."*
*"पण आम्ही थांबलो नाही. ७२ तासांच्या आत alternate route, emergency procurement आणि site-based engineering वापरली. आणि अगदी वेळेच्या शेवटच्या टप्प्यावर — प्रकल्प पूर्ण झाला.* "
*"त्या दिवशी मला उमगलं* —
*Monitoring म्हणजे data चं representation नव्हे, तर उत्तरदायित्वाचं प्रतिबिंब असतं!"*
*समारोप* : उजेडाच्या दिशेने
*"तुम्ही जेव्हा Daily Progress Report लिहिता — तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा," सर म्हणाले, "त्या एका टाकलेल्या अपडेटमुळे एखादं गाव अंधारात राहतं की उजेडात न्हातं — हे ठरवण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे."*
*"Dashboard वर जेव्हा लाल चिन्ह दिसतं — तो केवळ alert नसतो, तो जबाबदारीचा इशारा असतो."*
*"Trend analysis एखाद्या fault ची सूचना करतं — ती भविष्यातील संकट टाळण्याची संधी असते."*
*शेवटची ओळ* : *विश्वास, सुरक्षा, भविष्य*
कुंदन सरांनी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला.
*"तुम्ही महापारेषणचे अभियंते आहात.*
*तुमचं काम वीज वहन करणं नाही,*
*तर विश्वास, सुरक्षा आणि भविष्य*
*वाहून नेणं आहे!"*
💡 *प्रत्येक आकड्याच्या पलीकडे एक जबाबदारी आहे.*
*प्रत्येक तांत्रिक उपाययोजनेच्या मुळाशी एक मानवी धडपड आहे.*
*आणि प्रत्येक अभियंत्याच्या हृदयात एक उजेडाची शपथ आहे.*
*ही आहे विद्युतप्रवाहाची शर्थ — कुंदन सरांच्या शब्दांतून पेटलेली प्रेरणा! ⚡*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा