*"सतर्कतेचा धागा – महापारेषणच्या खऱ्या योद्ध्यांची एक सत्यकथा"*
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, कार्यकारी अभियंता , महापारेषण जेजुरी (प्रशिक्षक प्रशिक्षणार्थींना कथा सांगत आहेत)
आज
मी तुमच्यासमोर एक अशी कथा सांगणार आहे, जी
काल्पनिक नाही – ही घटना अगदी अलीकडेच आपल्या महापारेषणच्या ४०० के.व्ही.
जेजुरी उपकेंद्रात प्रत्यक्ष घडलेली आहे.
ही कथा आहे *माणसाच्या डोळ्यातील जागरूकतेची, मनातील जबाबदारीची आणि हातातील कौशल्याची.*
*घटना आहे
कोंढवा-बेजवळील २२० के.व्ही. लाईनची. एका रोजच्या देखरेखीत, वाऱ्याच्या झुळुकीने उडालेला एक
प्लास्टिकचा कापडाचा तुकडा अर्थ वायरवर अडकतो.*
साधारण डोळ्यांना कदाचित ही बाब लहान वाटली असती, पण त्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकला असता – शॉर्ट सर्किट, आगीचा धोका, लाईन ट्रिपिंग, प्राणहानी सुद्धा.
पण
त्याच वेळी, श्री. दिलीप
गावंडे या अनुभवी तंत्रज्ञाची नजर या धोकादायक स्थीतीवर जाते.
ते
फक्त बघून थांबत नाहीत — ते तात्काळ कार्यवाही करतात.
हेच तर खरे लक्षण असते तंत्रज्ञाचे – *सावध डोळा आणि सजग मन!*
गावंडे
यांनी ही माहिती तातडीने संबंधित
अधिकाऱ्यांना दिली.
आणि
मग, श्री. राहुल खरात
या तंत्रज्ञाने पूर्ण सुरक्षा पद्धतींचं
पालन करत, धाडस दाखवत तो
प्लास्टिकचा कपडा थेट अर्थ वायरवरून काढून टाकला. switchyard मध्ये सर्व चालू असताना. Gantri वरुन अर्थ wire पर्यन्त
पीक ला जात. आपण विडियो पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. विडियो दाखवतात.
यामध्ये त्यांना सौ. शबिना गुजले, श्री. नितीन बाजारे, श्री. योगेश आबनावे, श्री. राज जाधव आणि श्री. चेतन ताथोड या सहकाऱ्यांनी देखील भरभरून साथ दिली. या संपूर्ण कार्यवाहीचं मार्गदर्शन श्री. इम्रानखान मुल्ला (अतिरिक्त कार्यकारी अभियंता ) यांनी केलं – त्यांनी थंड डोक्याने निर्णय घेत, प्रत्येक टप्पा नीट समजावून सांगत आपली टीम योग्य दिशेने नेली.
ही कथा माझ्या कल्पनेतून नाही, कोणत्याही गोष्टीच्या पुस्तकातून नाही – *ही आपल्याच महापारेषण कुटुंबात घडलेली एक खरी, प्रेरणादायी घटना आहे.*
*ही घटना आपल्याला
शिकवते –*
✨ *सतत सतर्क राहा,*
✨ *तुमचं निरीक्षण हेच
पहिलं संरक्षण आहे,*
✨ *टीमवर्क आणि संवाद म्हणजे आपली खरी ताकद आहे,*
प्रशिक्षणार्थी
मित्रांनो,
तुम्ही
आता महापारेषणच्या सेवेत प्रवेश करत आहात.
*तुमचं काम केवळ
तांत्रिक ज्ञान वापरण्याचं नाही, तर सतत सजग आणि
उत्तरदायी राहण्याचं आहे.*
उद्या कदाचित अशाच एखाद्या क्षणी तुमचं नावही अशाच खऱ्या कथांमध्ये घेतलं जाईल!
या खऱ्या योद्ध्यांना – श्री. गावंडे , श्री. खरात आणि त्यांच्या संपूर्ण टीमला – एक दिलखुलास सलाम! 🙏
*⚡ तुम्हीही विद्युत
सुरक्षेचे पुढचे शिलेदार आहात.*
🌱 *तयार आहात ना, ती जबाबदारी आपल्या हृदयात कोरण्यासाठी?*